आयुष्यमान कार्ड WhatsApp द्वारे कसे डाऊनलोड करावे? (Ayushman Card on WhatsApp 2026)
तर मित्रांनो, आज मी तुमच्यासाठी परत एक नवीन महत्त्वपूर्ण माहिती, महत्त्वपूर्ण अपडेट घेऊन आलोय!तुम्हाला आयुष्यमान भारत कार्ड हे तर माहितच असेल. आयुष्यमान कार्ड या अंतर्गत तुम्हाला पाच लाख रुपयापर्यंत मोफत जो काही आपला आरोग्य विमा आहे तो इथे तुम्हाला दिला जातो. भारत सरकारने सर्वांसाठी आयुष्यमान कार्ड काढलेलं होतं, जे की 70 प्लस व्यक्ती आहेत, अशा सर्व व्यक्ती हे आयुष्यमान कार्ड ऑनलाईन पद्धतीने काढू शकतात. आपल्यामध्ये जवळपास 80 ते 90 टक्के लोकांनी आपले स्वतःच आयुष्यमान कार्ड काढलेले आहे, पण अजूनही असे काही लोक आहेत की ज्यांनी आयुष्यमान कार्ड काढलेलं नाही.
आजच्या ब्लॉगमध्ये आपण पाहणार आहोत की ऑनलाईन पद्धतीने आयुष्यमान कार्ड हे WhatsApp द्वारे पण तुम्ही कशा प्रकारे डाऊनलोड करू शकता किंवा त्याची केवायसी कशा प्रकारे करू शकता. किंवा जे काही हॉस्पिटल असतील, नियर मधले प्लकेबल हॉस्पिटल, ते हॉस्पिटल कशा प्रकारे शोधू शकता. असे विविध जे काही आयुष्यमान कार्ड रिगार्डिंगचा अपडेट आहेत, सर्विसेस आहेत, त्या संपूर्ण सर्विसेस तुम्ही अगदी घरी बसून तुम्ही तुमच्या WhatsApp वरून पण इथे करू शकता.चला तर WhatsApp द्वारे ही सर्विस कशाप्रकारे डाऊनलोड करू शकता, युज करू शकता त्याचा अपडेट जाणून घेऊया.
WhatsApp वरून आयुष्यमान कार्ड डाऊनलोड करण्याची संपूर्ण प्रोसेस:
* *स्टेप १:* सर्वात अगोदर तुमच्या होम स्क्रीनवर या आणि WhatsApp ओपन करा.
* *स्टेप २:* हा दिलेला नंबर आहे *729 82 38 38*. हा WhatsApp नंबर तुम्हाला डायल करायचा/सेव्ह करायचा आहे आणि इथे अशाप्रकारे तुम्हाला ही सर्विस (आयुष्यमान सारथी) ओपन झालेली दिसून जाईल.
* *स्टेप ३:* इथे आल्यानंतर सिम्पली तुम्हाला इथे *'हाय' (Hi)* सेंड करायचं. हाय सेंड केल्यानंतर ऑटोमॅटिकली त्यांच्याकडून रिप्लाय येऊन जाईल (Welcome to PMJAY).
* *स्टेप ४:* तिथे आल्यावर तुम्हाला English किंवा मराठी लँग्वेज सिलेक्ट करायची आहे.
* *स्टेप ५:* लँग्वेज सिलेक्ट केल्यानंतर *'Choose Service'* यावर क्लिक करा. इथे तुम्हाला आयुष्यमान कार्डचे विविध सर्विसेस दिसतील (Check Eligibility, Wallet, Find Hospital, My Ayushman Card इत्यादी).
* *स्टेप ६:* ऑनलाईन पद्धतीने आयुष्यमान कार्ड डाऊनलोड करण्यासाठी *'My Ayushman Card'* या ऑप्शनवर तुम्हाला क्लिक करायचं आहे.
* *स्टेप ७:* जर तुम्ही ऑलरेडी आयुष्यमान कार्डसाठी अप्लाय केलेलं असेल आणि ते डाऊनलोड करायच असेल तर सिम्पली एक नंबरचा ऑप्शन *'Download Ayushman Card'* सिलेक्ट करायचं आहे. (जर नवीन असाल तर 'Apply for PMJAY Card' वरून पण अप्लाय वगैरे करू शकता).
* *स्टेप ८:* ऑप्शन सिलेक्ट करून सबमिटवर क्लिक केलं की लगेच *'Enter Detail'* यावर तुम्हाला क्लिक करायचं.
* *स्टेप ९:* इथे सिलेक्ट स्टेट (महाराष्ट्र राज्य) आणि खाली सिलेक्ट आयडी प्रूफ (आधार नंबर) हे ऑप्शन सिलेक्ट करा. इथे तुम्हाला तुमचा 12 अंकी आधार कार्ड नंबर एंटर करायचा आहे.
* *स्टेप १०:* आधार कार्ड नंबर एंटर केल्यानंतर *'Validate Detail'* वर तुम्हाला क्लिक करायचं. लगेच त्याच्यावर एक OTP जाईल.
* *स्टेप ११:* तो OTP तुम्हाला इथे एंटर करावा लागतो आणि *'Verify OTP'* वर क्लिक केलं की ऑटोमॅटिकली तुम्हाला तुमचं जे काही आयुष्यमान कार्ड असेल, ते तुम्हाला इथे PDF द्वारे पाठवलं जातं.
*निष्कर्ष:* तर मित्रांनो, अशाप्रकारे ही आयुष्यमान कार्डची प्रोसेस दिलेली आहे. ऑनलाईन पद्धतीने तुम्ही WhatsApp वरून पण आयुष्यमान कार्ड डाऊनलोड करू शकता. यामध्ये मित्रांनो तुम्हाला जर कुठे काही अडचण येत असेल नक्की मला कमेंट मध्ये सांगा, मी तुम्हाला तिथे नक्की मदत करेल.पुन्हा भेटूया अशाच एका नवीन माहिती सोबत! जय हिंद!e